मनसे च्या पाठपुराव्यामुळे RTO लागले कामाला
मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या आंदोलनामुळे मुजोर खाजगी बस चालकांवर कारवाई
दि. ६. मानखुर्द. मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्याकडे अनेक प्रवाशी नागरिकांनी लेखी तक्रारी दिल्या होत्या कि ऐन सानसूदीच्या काळात खाजगी बस मालक वर्ग तिकीट दर वाढवत आहेत आणि आमच्या मजबुरीला संधी समजून हवे ते दर लावत आहेत. यावर खांडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्र दिले आणि आंदोलनाचा इशारा देताच कारवाईला सुरुवात केली भरपावसात मनसे कार्यकर्ते तिकीट दर वाढीविरोधात उभे होते त्यामुळे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना येउन मुजोर बस चालकांवर कारवाई करावी लागली आणि खांडेकर यांनी सांगितले कि जेव्हा जेव्हा दर वाढविल्यावर प्रवाशांच्या तक्रारी येतील तेव्हा तेव्हा मनसे आंदोलन करेल त्यामुळे स्थानिक नागरिकांचा मनसेवरचा विश्वास वाढला असून इतर पक्ष घाणेरडे राजकारण करत असताना मनसे रस्त्यावर उतरते आणि जसे बोलेल तसे कृतीतही आणते असे नागरिकांचे मत आहे.