महाराष्ट्रराजकीय

शाळा महाविद्यालयात मुलींवर हाथ टाकणाऱ्यांचे हात पाय तोडा -अमित ठाकरे

हाथ पाय तोडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३ ऑगस्ट.   पुण्यातील सभेत पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना मनसे नेते यांनी पदाधिकाऱ्यांना कडक आदेश दिला. त्यांनी सांगितले की हल्ली शाळा आणि महाविद्यालयात मुलींवर हाथ टाकण्याचे प्रमाण वाढले असून पदाधिकाऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे,

अशा नराधमांचे हाथ पाय तोडून पोलिसांच्या हातात द्या, आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊनच आजच्या मावळ्यांनी कृती केली पाहिजे, आपल्यावर सन्मा राजसाहेबांचा हाथ असून त्यांच्याकडेच सत्ता आहे अशा प्रकारे खंबीर आणि आश्वासक अशी साद महाराष्ट्र सैनिकांना घातली. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांच्या या अशा बेधडक आणि वादळी वक्तव्यामुळे आता मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्यांमध्ये दहशत बसली असून माध्यमांमध्ये हा एकच चर्चेचा विषय बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button