महाराष्ट्रमुंबईराजकीय
राज्यातील शाळा महाविद्यालये यांची नावे मराठीत करण्याची मागणी.
मनसे नेते अमित ठाकरेंनी सरकारकडे केली आग्रही मागणी

दि. १३. मुंबई. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाचं नाव हे मराठीत असावी अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे.
मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा हा मनसेच्या मागणीमुळे मिळाला हे सर्वश्रुत आहे त्यातच मनसेने बँका, आस्थापना सर्वच ठिकाणी मराठी सक्तीची व्हावी अशी मागणी केली असताना राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये यांचीही नावं मराठीत असावी आणि दर्शनी भागात स्पष्टपने लिहिली असावी अशी आग्रही मागणी सरकारकडे केली आहे, मनसे आंदोलने पाहता सरकारसुद्धा योग्य प्रतिसाद देईल अशी अशा जनमाणसातून व्यक्त केली जात आहे.