महाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पाठपुराव्याने शिक्षकांना मिळणार न्याय
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

दि. ५ ऑक्टोबर मुंबई.
आज मनसे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांची भेट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतली.
या भेटी दरम्यान मनसे नेते श्री संदीप देशपांडे , श्री. संतोष धुरी आणि श्री. अनिकेत घुगे, श्री. संतोष नाग हे देखील उपस्थित होते.
श्री संदीप देशपांडे यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रश्न आयुक्तांसमोर मांडले व त्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली.अर्धा तास जवळपास चर्चा करण्यात आली.
आयुक्तांनी सर्व प्रश्न समजून घेतले.
थकबाकी देण्यासंदर्भात आयुक्त सकारात्मक आहेतअसे दिसून आले,लवकरच शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.मनसे मुळे आम्हाला न्याय मिळत आहे अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.