महाराष्ट्रमुंबई
पडलेल्या झाडावरून मनसेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी लक्ष वेधले

दि. ५ मुंबई. मानखुर्द मधील लल्लूभाई कंपाऊंड येथे वादळी वाऱ्यामुळे पडलेले झाड शेवटच्या घटका मोजत आहे.गोवंडी मानखुर्द सारख्या विभागाला प्रदूषणाचा विळखा असून झाडे लावण्याऐवजी पडलेली झाडे दहा दिवस होऊन गेली तरी प्रशासन ढुंकून बघत नाही, असा आरोप जगदीश खांडेकर यांनी केला आहे.
“आमच्या विभागाला प्रदूषणाच्या राक्षसापासून वाचवणाऱ्या या झाडाला वाचवा अन्यथा मनसेच्या रोषाला सामोरे जा” असा इशारा मनसे मानखुर्द विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी दिला आहे, तेव्हा आता मनपा आणि एम एम आर डी ए कधी कारवाई करतात?असा प्रश्न स्थानिक जनतेला पडला आहे.