
दि. २९ मुंबई. मानखुर्द छ शिवाजी नगर विधानसभा मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या वतीने दरवर्षी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली जाते. हे स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये पक्षाच्या वतीने आकर्षक पारितोषिके दिली जातात. या स्पर्धेचा मुळ गाभा हा पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्त्री पुरुष समानता, बालमजुरी, हुंडाबळी, लोकशाही अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेला आहे.पक्षाच्या वतीने एक संपर्क क्रमांक जाहीर केला असून त्यावर फोटो आणि विडिओ स्पर्धकांच्या वतीने पाठवले जातात तसेच पक्षाच्या वतीनेही सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवास भेट दिली जाते. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून श्री गणेशाच्या भक्तीसोबतच सामाजिक, राजकीय, पर्यावरण आणि अशा अनेक पैलूमधून स्पर्धेच्या माध्यमातून आनंद उलगडताना दिसून येतो व उत्सव साजरा करण्यास हुरूप येतो म्हणून मनसे ने राबविलेल्या या उपक्रमास नेहमी उत्तम प्रतिसाद मिळत राहिला आहे.ह्याहीवर्षी आतापर्यंत शेकडो मंडळानी आणि घरगुती गणेशोत्सव मंडळींनी सहभाग नोंदवला असून, त्यात तरुण मंडळींनी हिरीरीने भाग घेतल्यामुळे समाजातील सर्व थरातून मनसे विभाग अध्यक्ष श्री जगदीश खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होताना दिसत आहे.