आमच्याबद्दल

नमस्कार,
मी जगदीश खांडेकर गेल्या चोवीस वर्षांपासून मा. राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेपासून कार्यरत आहे. आदरणीय राज साहेबांमुळे आयुष्यात ध्येय गाठण्याची उर्मी मिळाली नव्हे जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याचे बळच मिळाले म्हणा.. इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्याआधीच भारतीय विद्यार्थी सेनेत प्रवेश करून मनसे नेते श्री. राजा चौगुले, श्री. नवीन आचार्य यांच्यासोबत कार्याला सुरुवात केली.
रेल्वेभरती आंदोलनात सक्रिय सहभागी झालो विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. ज्या वयात महाविद्यालयीन मुले वेगळ्या विश्वात रमत असतात त्या वयात मा. राजसाहेबांचा झेंडा घेतला आणि संघर्ष करायला शिकलो. पक्षात काम करत असताना राजसाहेबांवर सतत लिहावे असे वाटायचे. म्हणून, एका मित्राच्या साप्ताहिकात कार्यकारी संपादक म्हणून सामाजिक, राजकीय विषयांवर लिहीत असताना मा. राजसाहेबांवर लिहायचा मोह आवरला नाही.
मा राजसाहेबांचे व्यक्तिमत्व लिहायला बसले तर वर्तमानपत्रांची पानांची मर्यादा येईल. कारण अभ्यासू नेतृत्व राजसाहेब म्हणजे स्वतामध्ये एक विद्यापीठच! मला एका मित्राने सांगितले कि एखादे मासिक काढ आणि लिहीत जा. मी मासिक नोंदणीसाठी दिल्ली कार्यालयात राजसाहेबांना अधोरेखित करणारी दोन तीन नावे पाठवली. त्यातील “राजगौरव ” हे नोंदणीकृत झाले. पक्ष सचिवांमार्फत मा राजसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालत अंक तयार केला. २००७ साली रवींद्र नाट्यमंदिर, दादर येथे दस्तुरखुद्द राजसाहेबांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन केले, त्यावेळेस मा. सौ. शर्मिला वहिनीसाहेब ही उपस्थित होत्या. मग असे अनेक अंक साहेबांनी प्रकाशित करून वेळोवेळी शाबासकी आणि सूचना ही केल्या.
एका अंकात लालू प्रसाद आणि उत्तरभारतीयांवर टीका केल्यामुळे “दोपहर का सामना” मध्ये माझ्यावर कारवाई व्हावी अशी बातमी छापून आली. ही बातमी मी राजसाहेबांना दाखवली. जरा मनस्थिती गोंधळून गेली असता राजसाहेबांचं एकच वाक्य आलं “बिनधास्त लिहत जा मी बघतो “या वाक्यामुळे “शंभर हत्तीचं बळ” आलं. म्हणूनच कोणताही सैनिक केसेस घ्यायला मागेपुढे पाहत नाही, टोल नाका तोडफोड आंदोलन, महापालिका विरोधात आंदोलन अशा अनेक केसेस माझ्यावरही आहेत.
पण या सगळ्या जनहितार्थ, मा. राजसाहेबांवर शंभरच्या वर केसेस आहेत त्यातली एक ही वैयक्तिक स्वार्थसाठी नाही. म्हणूनच कोणताही सैनिक केसेस घ्यायला मागेपुढे पाहत नाही, राजसाहेबांची प्रखर भूमिका, वक्तव्य विरोधकांकडून टीकाग्रस्त होते. परंतु, भविष्यात ती महाराष्ट्र राज्याच्या हिताची असते हे नेहमीच सिद्ध झाले आहे व महाराष्ट्राला देखील ते कळत आहे. मराठा आंदोलनाबाबत आंदोलकांच्या समोर बसून ठामपणे आपली भूमिका ठामपणे आंदोलकांना साहेबांनी समजावून सांगितली.
बदलापूर प्रकरणात मनसेने बाजू लावत राजसाहेबांनी हे पूर्ण प्रकरण कुटुंब प्रमुखांप्रमाणे हाताळले, महाराष्ट्र व मराठी माणसाच्या साठी स्थानिक पातळीवर घेतल्या गेलेल्या कार्यकर्ते यांच्या आंदोलन, प्रदर्शन या सर्व प्रकरणांमध्ये राजसाहेब कार्यकर्त्यांच्या पाठीशी “बाप” म्हणून उभे राहिले. सत्ता नसताना कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे कसे उभा राहायचे यासाठी बाकी नेत्यांनी मा राजसाहेबांकडे क्लास लावावा. कारण मनसेकडे सत्ता जरी नसली तरी सत्ताकेंद्र शिवतीर्थावरच आहे.
मी सतत राजसाहेबांचे विचार लिहीत राहिलो राज्यातील पक्षाचे कार्यक्रम वार्तांकन करत होतो,आता मध्यंतरी कोरोना काळात सर्वच वर्तमानपत्र बंद होते, ही परिस्थिती प्रसारमाध्यमांना भविष्यासाठी सूचित व अद्यावत करणारी होती. नुकतीच डिजिटल विश्वात राजसाहेब व पक्षाचे विचार घेवून प्रवेश करत आहे. आता या वेब पोर्टलच्या माध्यमातून पक्षाचे विचार आणि घडामोडी घराघरामध्ये पोचविण्यासाठी सज्ज आहोत. वाचक व पक्ष पदाधिकाऱ्यांना दर महिन्याचा “ई पेपर ” या पोर्टलवर वाचता येणार आहे. www.rajgaurav.live ही लिंक आहे, या लिंक वर क्लिक करून भेट देता येईल. आपल्या विभागातील पक्ष कार्यक्रम,घडामोडी “व्हॉट्सॲप” या बटनावर क्लिक करून पाठवता येतील किंवा सूचना ही पाठवता येतील.
सध्या मा. राजसाहेबांच्या आदेशाने मानखुर्द – छ. शिवाजी महाराजनगर विधानसभा विभाग अध्यक्ष म्हणून पक्षकार्य करत आहे. मनसैनिकांचे लाडके युवा नेतृत्व मा. अमित साहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन नेहमीच असते, आणि स. सौ. शर्मिला वहिनींची पाठीवर नेहमी पडणारी मायेची आणि कौतुकाची थाप हीच माझ्या आयुष्याची कमाई आहे. या वेब पोर्टलचा पक्ष प्रचारासाठी नक्कीच फायदा होईल यात शंका नाही. एकूणच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाटचालीत “राजगौरव” समूहाचा खारीचा वाटा नक्की असेल अशी आशा व्यक्त करत आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
जगदीश यशवंत खांडेकर
संपादक – राजगौरव
विभाग अध्यक्ष – मनसे
मानखुर्द – छ. शिवाजी महाराजनगर विधानसभा
संपर्क क्रमांक
8419999084
8454859999.
ई-मेल -rajgauravlive@gmail.Com
वेब -www.rajgaurav.live