महाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरेंचा एक निर्णय आणि मनसेत जल्लोष!

अमित ठाकरे आणि संदीप देशपांडेंच्या निवडीने महाराष्ट्र सैनिक खुश

मुंबई, २७ मार्च.

निवडणुका आल्या, झाल्या, निकाल लागले, प्रत्येक जनाने आपली मतं मांडली, पण अख्या देशात ठामपणे पुन्हा एकदा गंगा नदीच्या साफसफाई बद्दल बोलले,एकच ठाकरे बोलले ते म्हणजे राज ठाकरे, अशी लोकं बोलत आहेत.भोंग्यावर सुद्धा बिनधास्तपणे राज ठाकरेच बोललेत अशी जुनी लोकं सांगत आहेत.

आपल्याकडे जी संघटना आहे ती शिस्त बद्ध आहे, तरुण आहे,धोरणी आहे तरीही अपयश का येत? तर विरोधी पक्षांचे खोटे बोलणे आणि सत्तेसाठी जनतेताच लुटलेला पैसा लोकांमध्ये वाटणे आणि निवडणुका जिंकणे, हे तत्व आहे असे लोकच आता बोलू लागले आहेत.

परंतु हा सर्व गेम होत असताना बऱ्याच वेळा कार्यकर्ते नाराज झाले सततची हार कोणाला पचणार शेवटी माणूसच ना मनानेही हरतोच.

पण राज ठाकरे हे व्यक्तिमत्व आयत्या पिठावर रेखोट्या ओढून नाही जन्माला आलं, स्व बाळासाहेबांच्या नंतर जर शिवसेनेसाठी कोणी झगडले असेल ते म्हणजे राज ठाकरे, असे शिवसैनिकही म्हणतात.

हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पाहतोय,
आता नुकतीच विधानसभा निवडणूक जाली मनसेने डेअरिंग केली बऱ्याच सीट्स उभ्या केल्या शक्य तिथे मदतही दिली कोणत्या ना कोणत्या प्रकारे, तरीही यश नाही पण या ठिकाणी सगळीकडेच हताश वातावरण असताना राज ठाकरे एका वेगळ्याच भूमिकेत दिसले ती भूमिका कोणालाच जमत नाही जमली नाही, ती म्हणजे कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाची,धैर्याची वेसण घालनं
आणि ती त्यांनी प्रभाविपणे घातल्याचे दिसते,
दुसऱ्या पक्षात घोडेबाजार चालू असताना पराभव होऊन सुद्धा कार्यकर्ता कुठेच गेला नाही असा एकमेव पक्ष मनसे राहिला ही जन्मानसात चर्चा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्र सैनिक प्रचंड खुश झाले एक म्हणजे तरुण नेते अमित ठाकरेंना पक्षाचा कणा असणारी शाखाध्यक्ष केंद्रीय समिती आणि दुसरे म्हणजे अभ्यासू, तरुण तडफदार संदीप देशपांडे यांची मुंबई शहराध्यक्षपदी निवड या दोन बाबींमुळे मनसेत नवचैतन्य निर्माण झाले असून, महाराष्ट्र सैनिक पुन्हा एकदा सज्ज झाल्याचे दिसून येते.तसेच तरुण उपाध्यक्ष योगेश सावंत, यशवंत किल्लेदार आणि कुणाल माईणकर व विविध पदाधिकारी केंद्रीय समितीवर नेमले याचा मनसेला झालेला फायदा काही सभामधून दिसून येत आहे.पाडवा मेळाव्याला याचा नारळ फोडून महापालिका रणशिंग फुंकले जाईल अशी माहिती मुंबई शहर अध्यक्ष श्री संदीप देशपांडेनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button