महाराष्ट्रमुंबईराजकीय
मुख्यमंत्र्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
मनसे नेते अमित ठाकरेंना आमदारकीची ऑफर?

दि. १० फेब्रुवारी, मुंबई. आज मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून राजकीय मैदानात हल्लकल्लोळ माजला असून सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची ऑफर दिल्याची चर्चा जोर धरत आहे, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रतिक्रिया देतीलच, परंतु फडणवीस यांनी सांगितले कि मुख्यमंत्री झाल्यावर राज यांनी अभिनंदन केले तेव्हा मी भेटायला येईन असे सांगितले होते म्हणून आजची भेट होती, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात ही भेट असू शकते तसेच विरोधी पक्षात पण प्रतिक्रिया देण्याची चुरस लागल्याचे दिसून येते.