महाराष्ट्रमुंबईराजकीय

मानखुर्द शिवाजीनगरच्या घमासान मध्ये मनसे कडे सर्वांचे लक्ष

मनसे उमेदवार जगदीश खांडेकर यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

दि. 13.नोव्हेंबर.

मुंबई :  राज्यात सर्वत्र विधानसभेचे घमासान सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडी मध्ये राज ठाकरेंच्या मनसेने देखील दंड थोपटल्याने राज्यभर विविध विधानसभांच्या निकालात मनसेची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. मनसे निवडक जागा लढवत असल्याने काही ठिकाणी मनसे विजयाचा गुलाल घेऊ शकते तर काही ठिकाणी निर्णायक भूमिकेत असणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर मनसेचा थेट निवडणुकीत सहभाग असल्यामुळे मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्यात लक्षणीय चैतन्य निर्माण झाले आहे. देशात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपा व काँग्रेस घटक पक्षात घामासान असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचा करिष्मा झाला आणि सरासरी राज ठाकरेंच्या जाहीर सभा झालेल्या लोकसभेच्या जागा महायुतीला मिळाल्या. त्यामुळे राज ठाकरे यांची हिंदू मराठी मतदारांमध्ये असलेली “क्रेझ” कायम असल्याचे दिसून आले. यावेळी राज ठाकरे यांनी आपले सुपुत्र यांच्यासह महाराष्ट्रात १३५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. राज ठाकरेंच्या सभांमधून मनसे विधानसभा निवडणूकीत अतिशय गंभीर दिसते. हिंदू व मराठी मतांमध्ये मनसेची असलेले प्रतिभा सभांच्या गर्दीमधून दिसत असल्यामुळे मनसेने निश्चितच काही ठिकाणी विजयाचे अंदाज लावले असणार.

सध्या मुंबईतील बहुचर्चित मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा विविध मुद्द्यांवर गाजत आहे. प्रामुख्याने, अंमली पदार्थ विक्री, प्रदूषण व आरोग्य, शिक्षण, स्वच्छता समस्या सर्वच उमेदवारांचा प्रचार मुद्दा आहे. मनसे उमेदवार जगदीश खांडेकर यांनी याबाबत अनेक वेळा “मनसे स्टाईल” आवाज उठवला आहे. त्यामुळे जगदीश खांडेकर हे नाव नागरिकांना सुपरिचित आहे. स्थानिक पोलीस स्टेशन, महानगरपालिका प्रभाग कार्यालय येथे मनसैनिकांकडून नागरिकांना नेहमीच सहकार्य होत असते. जगदीश खांडेकर यांच्या मध्यवर्ती कार्यालयात विविध नागरिक आपले प्रश्न समस्या घेऊन येत असतात त्या देखील तातडीने निकालात काढल्या जातात त्यामुळे मनसे कार्यालयाकडे नागरिक सतत येत असतात. मतदारसंघातच “वाशी टोलनाका” येत असल्याने देशभर गाजलेले टोलनाका आंदोलनात स्थानिक म्हणून जगदीश खांडेकर यांनी हिरारीने सहभाग घेतला होता. बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचार विरोधात मानखुर्द मध्ये महिला विद्यार्थिनींचा भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले होते. पक्षीय व सार्वजनिक उपक्रम राबविल्याने मनसे उमेदवार जगदीश खांडेकर व जनतेची नाळ जुळली आहे. त्यामुळे मनसेला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत राज्यभर राज ठाकरे यांची महाराष्ट्र व हिंदू,मराठी संस्कृतीवर परखडपणे मत मांडण्याची शैली देखील येथील नागरीकांत नेहमी चर्चित असते. अशातच एक स्थानिक, सुशिक्षित युवक उमेदवार म्हणून जगदीश खांडेकरांना हिंदू मराठी मतदारांमधून वाढता पाठिंबा मिळत आहे. प्रचार, पदयात्रा, घरभेटी दरम्यान त्यांना ठीकठिकाणी उत्स्फूर्तपणे ओवाळणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद देखील देण्यात येत आहे.

जवळपास ३.५ लाख मतदार असलेली ही विधानसभा जातीय समीकरणात मुस्लिम बहुल आहे. परंतु, दिग्गज मुस्लिम उमेदवारांत मताचे विभाजन अटळ असल्यामुळे हिंदू व मराठी मतदारांमध्ये मनसेला चांगली संधी आहे. २००९ साली मनसेने येथून विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी जवळपास २२ हजार मते मिळाली. मनसेने मतदासंघातील जातीय समीकरण पाहता हिंदू व मराठी मतांसाठी जगदीश खांडेकर यांना येथून मैदानात उतरले आहे. मनसेच्या प्रचार रॅली व घरभेटीस चांगला प्रतिसाद लाभत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार अबू आझमी, राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक सह शिवसेनेकडून सुरेश पाटील तसेच एमआयएम कडून अतिक अहमद खान उभे असल्यामुळे इतिहासात पहिल्या वेळेस मतदारांसमोर अनेक पर्याय आले आहेत. सर्वत्र मताची विभागणी असल्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या अबू आझमी यांच्यासाठी मुस्लिम विचारवंत यांना पाचारण करण्यात येत आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची रॅली तर एमआयएम उमेदवार यांच्यासाठी ओवेसी बंधूंच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेने देखील मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, चेंबूर मतदारसंघासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची सभा उद्या सायंकाळी वाशी नका येथे आयोजित केली. या सभेस राज ठाकरेंचे विचार ऐकण्यास मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जाणार आहेत. विशेष म्हणजे या सभेकडे मानखुर्द- शिवाजीनगरच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे कारण ही सभा मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघासाठी निर्णायक ठरू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button