महाराष्ट्रमुंबईराजकीय
आमदार बच्चू कडू यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

दि. ६ ऑगस्ट, मुंबई
आज आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. याआधीही कडू यांच्या या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा जाहीर करुन मनसे नेते बाळा नांदगावकर आंदोलन स्थळी उपस्थित होते.सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकारणाला कंटाळली असून जनतेच्या प्रश्नांवर मनसे ठाम उभी आहे आणि म्हणून कडू यांनी भेट घेऊन चर्चा केली अशी माध्यमामध्ये आणि जनतेत चर्चा चालू आहे.