मनसे च्या पाठपुराव्यामुळे मानखुर्द मधील पडलेले झाड झाले पुनर्जिवीत
मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

दि. ६. मुंबई. मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड मधील वादळी पाऊसामध्ये झाड पडले होते जवळपास पंधरा दिवस उलटून गेले तरीही प्रशासनाने लक्ष घातले नाही. लोकांनी मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयात तक्रार केली असता त्यांनी त्याठिकाणची पाहणी केली आणि प्रशासनाला इशारा दिला कि त्वरित हे झाड पुनर्जिवीत नाही केले तर मनसे स्टाईल ने आंदोलन केले जाईल तेव्हा प्रशासनाने जागे होऊन झाड पुन्हा लावले आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पाणी घातले व प्रशासनाला आवाहन केले, कि या झाडाला त्वरित कट्टा बांधून संरक्षण द्यावे तेव्हा प्रशासनाने सुद्धा लवकरात लवकर काम करून देतो असे कबूल केले असून स्थानिक नागरिकांनी मनसेचे आभार मानले कारण गोवंडी मानखुर्द छ शिवाजीनगर हा भाग प्रचंड प्रदूषित असून झाडे मोठ्या प्रमाणावर लावणे गरजेचे असताना प्रशासन लक्ष घालत नाही ही शोकांतिका आहे व लवकरच प्रदूषण विषयावर आंदोलन छेडणार आहे असे मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी सांगितले.
