उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा वरळीमध्ये मनसेत प्रवेश
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

दि. ३ मुंबई. वरळी विधानसभा शाखा समन्वयक, शिवसेना उबाठा गटाचे विशाल आकडे यांच्या सोबत त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मनसे नेते संदीपजी देशपांडे आणि वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे जनहित आणि विधीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजन आगलावे, विद्यार्थी सेनेचे भावेश कोळी, शाखा अध्यक्ष विजय पाटील, महिला शाखा अध्यक्ष शुभांगी पाटील आणि मनसैनिक सचिन महाडिक हे देखील उपस्थित होते. श्रेयस कडू, अमय कडू, हर्षल कानगुडे, सिद्धांत चौकी, सुजल साखरकर, जयवंत आखाडे, रोशन खरवार, निखिल खरवार, तेजस वांगुळे, निखिल खरवार, रवी सूर्यवंशी, गणेश पालशेतकर, सागर सावंत यांचे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’मध्ये ‘मनसे’ स्वागत केले,वरळीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, VISION वरळी पुढे नेण्यासाठी, मा. राजसाहेबांच्या दूरदृष्टिकोनातला महाराष्ट्र साकारण्यासाठी भवानी माता तुम्हाला नेहमी बळ देत राहील अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.