सौ शर्मिला वहिनी ठाकरे यांनी घेतली एन्काऊंटर करणाऱ्या व जखमी अधिकाऱ्यांची भेट
या आधीच पोलिसांना ५१०००/- बक्षीस जाहीर केले आहे

दि. २५. सप्टेंबर. बदलापूर मधील चिमुरडींवर अत्याचार केलेल्या नराधमाचा एन्काऊंटर केलेले व जखमी झालेले पोलीस अधिकारी ज्युपिटर इस्पितळात दाखल आहेत.मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ शर्मिला ठाकरे वहिनी यांनी दोन्ही पोलिसांची ठाणे ज्युपिटर हॉस्पिटल येथे भेट घेऊन प्रकृतीची विचारपुस केली. सोबत रीटा ताई गुप्ता, मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव मनसे सरचिटणीस सौ रिताताई गुप्ता सरचिटणीस सौ शालिनी ताई ठाकरे व ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे व सौ.समीषा मारकंडे व मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच वहिनींनी पोलिसांना बक्षीस जाहीर केले याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले असून अशा नराधमांवर कायद्याचा धाक असावा या भूमिकेला वहिनींनी खुला पाठिंबा दिला अशी पाठिंबा देणारी माणसे पुढे आली पाहिजे अशी जनतेची भावना आहे. तरच पुरुषी मानसिकतेला जरब बसेल असे सौ. ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले.