मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मानखुर्द विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण संपन्न.
बुद्धिबळ, संगीत खुर्ची (महिला ) चित्रकला व निबंध लेखन स्पर्धेचे केले होते आयोजन.

दि. १९. मुंबई. मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर जगदीश खांडेकर यांनी गणेशोत्सव निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते त्यातील निबंधलेखन व चित्रकलेच्या विजेत्यांना उत्सवसमयी मनसे नेते शिरिषजी सावंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले तर विसर्जनादिवशी महिलांसाठी घेण्यात आलेल्या संगीत खुर्चीमध्ये विजेत्या महिलेला पैठणी साडी व बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन विभाग अध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक श्री जगदीश खांडेकर यांच्या व सहकाऱ्यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.