महाराष्ट्रमुंबईराजकीय

कै सीताराम येचुरी यांना मा राजसाहेबांनी वाहिली श्रद्धांजली

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते येचुरी.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन झालं. तसा येचुरी यांचा किंवा एकूणच कम्युनिस्ट पक्षाचा माझा तसा कधी सहवास आलेला नाही, पण एक विचारसरणी एकदा का स्वीकारली की तिच्याशी कुठलीही प्रतारणा न करता, शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर श्रद्धा ठेवणारे भारतीय राजकारणात आता फक्त कम्युनिस्टच उरलेत असं म्हणावं लागेल, आणि याचंच मला खूप कौतुक आहे.

सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातले तसे बऱ्यापैकी प्रगतिशील विचारांचे नेते. कम्युनिस्टांचा काँग्रेस विरोध कडवा. पण किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी कम्युनिस्टांच मन वळवण्यात सीताराम येचुरी यांचा वाटा मोठा.
‘सत्ता’ हाच किमान समान कार्यक्रम झालेला असताना, सैद्धांतिक विरोध बाजूला ठेवून, काही मूलभूत प्रश्नांवर एकत्र येणे हे आता दुर्मिळच झालं आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या खासदाराची राज्यसभेची मुदत संपताना, सभागृहातील सदस्यांनी भावनिक निरोप देणे, हे येचुरींच्या बाबतीत घडलं.

विचारसरणीला घट्ट धरून राहण्याची परंपरा अस्तंगत होत असताना येचुरींसारख्या नेत्यांचं वेगळेपण जाणवत राहतं.

सीताराम येचुरींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button