मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मा अमित ठाकरे साहेबांच्या दौऱ्यामुळे पंढरपूर मतदारसंघात नवचैतन्य
महाराष्ट्र सैनिकांमध्ये कमालीचा उत्साह

दि. २३. सोलापूर.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप बापू धोत्रे यांनी २२ सप्टेंबर २०२४ रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्या पैलवानांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री.अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या प्रसंगी मा.अमित साहेबांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि अशा प्रकारच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल श्री.दिलीप बापू धोत्रे यांचे अभिनंदन केले.मा अमित साहेबांच्या एन्ट्रीमुळे मतदारसंघात मनसेची लाट आल्याचे वातावरण तयार झाल्यामुळे पक्षाला भरघोस फायदा होईल आणि दिलीप बापू धोत्रे आमदार होणारच अशी मनसैनिकांची भावना आहे.