महाराष्ट्रराजकीय
मा राजसाहेबांनी केली राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर
गरज पडली तर हाथ सोडून समजावयाचे कसे हे मनसेला माहित असे प्रतिपादन मा राजसाहेबांनी केले.
नवनिर्माण यात्रेचा आजचा टप्पा यवतमाळ जिल्ह्यात होता. आज वणीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला आणि मग पुढे पदाधिकाऱ्यांसोबत लोकमान्य टिळक चौकात संवाद होता, पण त्या संवादाचं रूपांतर एका मोठ्या सभेत झालं इतकी गर्दी वणीवासियांनी केली.
तेच कधीही न सुटलेले प्रश्न आणि तीच माणसं ज्यांच्यामुळे प्रश्न निर्माण पण होतात आणि प्रश्न सुटत नाहीत. या सगळ्याला महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे मी या जनसंवादात आवाहन केलं की या राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा, आणि मग बघा कसे प्रश्न सोडवतो ते.
पहिल्यांदा हात जोडून प्रश्न सोडवा असं सांगेन आणि नाही ऐकलं तर हात सोडून प्रश्न कसे सोडवायचे हे आम्हाला नीट माहित आहे.
आज मी संवादाच्या दरम्यान, वणी विधानसभेसाठी श्री. राजू उंबरकर यांच्या नावाची घोषणा केली.
’