मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे नेते अमित ठाकरे यांची नवी मुंबई व मुंबईत जोरदार एन्ट्री
सराव हंडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित

दि. १० ऑगस्ट मुंबई
मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबई आणि मुंबईत काही ठिकाणी सराव हंडीच्या कार्यक्रमाला भेट दिली. याप्रसंगी तरुण मंडळींनी उत्साहात त्यांचं स्वागत केलं, यासर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी शेकडो गाड्यांच्या ताफया सह जोरदार एन्ट्री अमित ठाकरे यांनी केली. विक्रोळी या ठिकाणी तर बाळ गोविंदाला उचलून कडेवर घेतलं हे सर्व पाहुन उपस्थित तरुण मंडळी भारावून गेली, तसेच कांजूरमार्ग येथे ही फटाक्यांच्या आतष बाजीत अमित ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. ठाकरे ब्रँड हा ब्रँड जरी असला तरीही सामान्य कार्यकर्त्यासारखे वागून मनाचा मोठेपणा दाखवणारा आणि सामान्य व तरुण कार्यकर्त्यांना संधी देणारं नेतृत्व म्हणजेच अमित ठाकरे अशी माध्यमांमध्ये व जन्मानसात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.