मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मनसे नेते शिरीषजी सावंत यांनी दिली भेट
या प्रसंगी मनसे आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पक्षाच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.

दि. १५ मानखुर्द,पी एम जी पी कॉलोनी येथील छत्रपती शिवाजी महाराज सोसायटी मध्ये गणेशोत्सव मंडळास मनसे नेते मा शिरीष सावंत साहेब यांनी भेट देऊन दर्शन घेतले. तसेच मानखुर्द छ.शिवाजी महाराज नगर मनसे विधानसभेच्या वतीने ज्या स्पर्धा घेतल्या गेल्या त्या स्पर्धेतील विजेत्यांना पक्षाच्या वतीने पारितोषिक रुपी सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला आणि शुभेच्छा दिल्या.
सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना उद्या पक्षाच्या वतीने पारितोषिक देण्यात येणार असून त्यांचा सन्मान करण्यात करण्यात येणार आहे असेआयोजक मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी सांगितले.