महाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी शिक्षकदिनास शिक्षकांचा केला सन्मान.
प्रत्येक शाळेला भेटून पक्षाच्या वतीने शुभेच्छा पत्र, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन केला सन्मान
दि. ५ सप्टेंबर.मानखुर्द. शिक्षकदिनाचे औचित्य साधून मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष श्री जगदीश खांडेकर आणि सहकारी यांनी विभागातील सर्व शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना शाल सन्मानचिन्ह आणि शुभेच्छा पत्र देऊन सन्मान केला, मनसेने आवर्जून येउन आमचा सन्मान केला ही आनंदाची बाब आहे असे शिक्षकांकडून सांगितले गेले व त्यानिमित्ताने त्यांनी मनसेचे आभार मानले. सोबत विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष श्री प्रकाश हंगारगे,मनविसे सचिव जितू मुढे, शाखाध्यक्ष सनी शिंदे, दया तुपे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते, या उपक्रमामुळे विभागातील शिक्षक आणि सामान्य नागरिक मनसेचे कौतुक करत आहेत.