महाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी दिला खाजगी बस मालकांना इशारा
उत्सव कालावधीत तिकीट दर न वाढवण्याची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागणी
दि 1 सप्टेंबर. मुंबई मानखुर्द येथून गणेशोत्सवात चाकरमानी गावी जातात परंतु याच मजबुरीचा फायदा खाजगी बस चालक मालक घेतात, अशा कित्येक तक्रारी मनसे कार्यालयात आल्या आहेत त्यामुळे पत्र लिहून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे कि या गोष्टीला आळा घाला अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा दिला आहे असे मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी सांगितले, दरम्यान अनेक प्रवाशांनी याबाबतीत मनसेचे आभार मानले असे मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे.