महाराष्ट्रमुंबईराजकीय
अमित ठाकरे यांचं शिक्षण मंत्र्यांना पत्र.
मराठी अध्यापनाबाबत गांभीर्य नसणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी

मुंबई. दि. ५ ऑगस्ट.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ती शिकवणं प्रत्येक शाळेसाठी कायद्याने अनिवार्य आहे.
सरकारचा स्पष्ट अधिनियम असूनही अनेक नामांकित शाळा मराठी विषय शिकवायला टाळाटाळ करत आहेत, ही मराठी अस्मितेची थट्टा आहे.
मराठीसाठी लढा हा केवळ भावनेचा नव्हे, हक्काचा आहे.
राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अध्यापनासंदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित ठाकरे यांच्यावतीने राज्यमंत्री, शालेय शिक्षण, डॉ. पंकजजी भोयर यांच्याकडे करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात मराठी भाषा आणि अस्मितेसाठी पुन्हा एकदा मोठा संघर्ष होणार असे दिसून येते.