महाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या आंदोलनामुळे सायन पनवेल महामार्गवरील मानखुर्द टी पॉईंट येथील काम सुरु.
मनसेच्या पाठपुराव्याला यश

दिनांक 18.
मानखुर्द टी पॉइंट टी जंक्शन पनवेल हायवे या ठिकाणी बरेच दिवसापासून खड्ड्यांच साम्राज्य झालेले होतं आणि जाणाऱ्यांना प्रवाशांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत होता तसेच काही मोठ्या प्रमाणावर अपघात झाले होते काही लोकांना इस्पितळात देखील दाखल व्हावे लागले होते,त्याच्या तक्रारी मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयात आले असता त्यांनी पीडब्ल्यूडी विभागाला इशारा दिला व आंदोलन केले आणि त्या आंदोलनाचे फलित म्हणून काल संध्याकाळी उशिरा या कामाला सुरुवात झाली त्याची कामाची पाहणी करून जगदीश खांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली कि याचे श्रेय हे मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र सैनिक यांना जाते, अशाच प्रकारे मनसे जनसेवेसाठी नेहमी तत्पर असेल. या वेळेस स्थानिक महाराष्ट्र सैनिक देखील उपस्थित होते.