मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी केले गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
या स्पर्धेत बऱ्याच मंडळानी आणि सामान्य नागरिकांनी भाग घेतला होता

दि. २१. मानखुर्द, मुंबई. मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर हे दरवर्षी सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा घेत असतात. या ही वर्षी या स्पर्धाचे आयोजन त्यांनी केले होते. बऱ्याच स्पर्धाकांनी यात भाग घेतला होता. आज मनसे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी विजेत्या स्पर्धकांना आज पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक मानखुर्द मधील झुंजार प्रतिष्ठान चा आला आणि द्वितीय क्रमांक शिवशंकर मित्र मंडळाचा आला. तसेच घरगुती स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक संतोष माने आणि द्वितीय क्रमांक विशाल भाऊ यांचा आला,या सर्वाना पक्षाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. झुंजार प्रतिष्ठानच्या वतीने मनसे चे आभार मानण्यात आले व सांगण्यात आले कि आज पर्यंत कोणत्याच पक्षाने आम्हाला अशा प्रकारे प्रोत्साहन दिले नाही परंतु गेली चार वर्षे सातत्याने मनसे मानखुर्द विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर अशा प्रकारे स्पर्धा राबवून आम्हाला प्रोत्साहित करत असतात, त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी राहू, व मनसेला मतदान करू. शेवटी खांडेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि सांगितले कि या विधानसभेत मनसे नक्कीच झेंडा फडकावेल.