मनसे नेते संदीप देशपांडे यांचं टी शर्ट ‘ वॉर ‘
नरेस सुरेस आणि परेस नावाने परिधान केलं टी शर्ट

दि १० मुंबई. मनसे नेते संदीप देशपांडे त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेबद्दल आणि टाईमिंग बद्दल अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे अशी एक विलक्षण शक्ती आहे ती म्हणजे रत्न पारखण्याची. त्यातीलच एक रत्न म्हणजे संदीप देशपांडे हे मनसेचे प्रवक्ते असून मुंबईचे शहर अध्यक्ष आहेत.मनसेवर कोणीही आघात करू पाहत असेल तर सर्वात आधी ढाल बनून तो आघात परतवून लावून समोरच्यालाच चेक मेट करण्याची अनोखी ताकद आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या राजकीय कौशल्याने मिडीयाला सुद्धा भुरळ पडत असते. आता मुंबई सह राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरल्यापासून पुलाखळून बरेच पाणी वाहून गेले त्यात आरोग्याला घातक असणारे कबुतर आणि त्यांची विष्ठा यामुळे कोर्टाने आदेश देऊन सुद्धा जैन समाज आक्रमक होताना दिसत आहे. आणि मतांसाठी भाजप पायघड्या घालत आहे. त्यामुळे हिंदी सक्ती आणि अशा प्रकारे गुजराती मारवाडी व इतर परप्रांतीयांना हे टी शर्ट घालून चड्डीत राहायचं असा मेसेज देऊन एक प्रकारे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा दंडच थोपटले आहेत. आणि याचीच चर्चा माध्यमांमध्ये जोर धरत आहे.