मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मनसे मानखुर्द -छ. शिवाजीनगर विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी गणेशोत्सवनिमित्त आयोजित केला स्पर्धा महोत्सव

मोठ्या संख्येने तरुण,तरुणी घेणार सहभाग, महिलाही होणार सहभागी.

दि. ७मानखुर्द. मनसे मानखुर्द छ. शिवाजीनगर विधानसभेचे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर हे गणेशोत्सवनिमित्त दरवर्षी स्पर्धा आणि बक्षीस समारंभ आयोजित करत असतात, या ही वर्षी सजावट स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा,चित्रकला आणि निबंधस्पर्धेचे आयोजन पक्षाच्या वतीने करण्यात आलेले असून आजची तरुण पिढी मोबाईल वर पूर्ण वेळ रील बघण्यात घालवतात या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धात्मक दृष्टिकोन वाढीस लागेल आणि त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन एकोपा वाढण्यास मदत होईल व उत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीगाठी होतील, पालकांना सुद्धा आपल्या मुलांनी स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवावीत अशी इच्छा असते, गणपतीच्या सुट्टीत गणपती दर्शन, आरत्या म्हणणे याबरोबरच स्पर्धेची जोड हे उत्तम समीकरण जुळून येते आणि ह्याला कारण म्हणजे सर्वांचा आवडता बाप्पा असे खांडेकरांचे मत आहे.तसेच महिला वर्गासाठी सुद्धा संगीत खुर्ची सारख्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत कारण महिलांना सुद्धा नोकरी,चूल आणि मुल यातून अजिबात वेळ मिळत नाही परंतु या कार्यक्रमांच्या निमित्ताने महिलावर्गाची कारमणूक होण्यास मदत होणार आहे त्यामुळे या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. शेवटच्या दोन दिवसात पारितोषिक समारंभ वितरित कारण्यात येणार आहे त्यामुळे सर्वच जण या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहेत असे मनसे कार्यकर्त्यांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button